Vihir Anudaan Yojana Maharashtra 2024 | बिरसा मुंडा विहीर योजना ऑनलाइन अर्ज

Vihir Anudaan Yojana Maharashtra 2024 : नमस्कार मित्रांनो , शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. तर ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधायची आहे. त्यांच्यासाठी ही उपयुक्त माहिती ठरणार आहे. बिरसा मुंडा विहीर योजनेअंतर्गत आदिवासी शेतकरी यांना विहीर खोदकाम करण्यासाठी दोन लाख 50 हजार रुपये पर्यंत अनुदान हे देण्यात येणार आहे.

बिरसा मुंडा विहीर योजना ऑनलाइन अर्ज | विहीर योजना ऑनलाइन अर्ज | विहीर योजनेचा अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात | ऑनलाईन अर्ज कुठे भरायचा याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Vihir Anudaan Yojana Maharashtra 2024

बिरसा मुंडा विहीर योजना

महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी कोणत्या ना कोणत्या योजना राबवून त्यांना मदत करत असते. या लेखांमध्ये आपण आदिवासी बांधवांसाठी राबवण्यात येणारी बिरसा मुंडा विहीर योजनेची संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत.

योजनेचे नाव बिरसा मुंडा विहीर योजना
राज्य महाराष्ट्र
वर्ष 2023-24
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
अनुदान२.५ लाख रुपये

बिरसा मुंडा विहीर योजना ही महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राबविण्यात येते. याचे ऑनलाईन अर्ज हे महाडीबीटी या वेबसाईट वरती भरणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड ही विभागीय पातळीवर लॉटरी पद्धतीने करण्यात येते.

बिरसा मुंडा विहीर योजना कागदपत्र व पात्रता

बिरसा मुंडा विहीर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता ही भासणार आहे.

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्यासाठी रहिवासी दाखला.
  • अर्जदार यांच्याकडे आधार कार्ड असावे. व आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
  • यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • लाभ मिळण्यासाठी नॅशनल बँकेमध्ये बँक खाते असणे आवश्यक.
  • अर्जदार आदिवासी असणे आवश्यक. त्यासाठी अर्जदाराकडे अनुसूचित जमातीचे सर्टिफिकेट म्हणजेच आदिवासी असल्याचे जातीचा दाखला हवा आहे.

तर मित्रांनो वरील पात्रता व अटी ह्या तुम्हाला बिरसा मुंडा विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्ण करावे लागणार आहेत.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावरती जायचे आहे ते तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेचा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकणार आहात.

मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायचे आहेत.

  • सर्वात आधी महाडीबीटी या पोर्टलला भेट द्या.
  • येथे नवीन शेतकरी नोंदणी करा
  • तरी नोंदणी झाल्यावर ती लॉगिन करून तुमची सर्व डिटेल्स भरा.
  • त्यानंतर बिरसा मुंडा विहीर योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे.

मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही ऑनलाईन अर्ज हा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकणार आहात. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती ही मिळवू शकता.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या पोर्टलला नक्की भेट देत रहा. किंवा गुगल वरती Gavit Online असे सर्च केले तरी आपली वेबसाईट ही तुम्हाला उपलब्ध होणार आहे.

Leave a comment