रेशन धान्य ऐवजी मिळणार पैसे | लवकर हा अर्ज भरून द्या ..
New Ration Card Update : मित्रांनो रेशन कार्ड बद्दल महत्त्वाची अपडेट आहे. ती म्हणजे आता रेशन ऐवजी त्या बदल्या तुम्हाला पैसे हे देण्यात येणार आहेत. तर ही योजना कोणत्या जिल्ह्यांसाठी लागू आहे. त्यासाठी ऑफलाइन अर्ज कुठे करायचा. याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
रेशन धान्य ऐवजी पैसे मिळणार | केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार पैसे | त्यासंदर्भात ऑफलाईन अर्ज कसा व कुठे करायचा याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
योजनेची थोडक्यात माहिती
छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना जानेवारी 2023 पासून अन्नधान्य ऐवजी प्रतिमाह 150 रुपये इतकी रक्कम देण्याचे मान्य केले आहे.
मात्र महागाईमुळे चालू वर्षी 2024-25 साठी ही रक्कम 170 रुपये ही रेशन कार्ड धारक यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने शासन निर्णय काढलेला आहे. सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती उपलब्ध आहे.
धान्य ऐवजी पैसे मिळवण्यासाठी कोणता फॉर्म भरायचा ?
धान्य ऐवजी जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला खालील फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म फक्त छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिका धारक त्यांनी भरायचा आहे.
वरील फॉर्म मध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे. शिधापत्रिकेचा बारा अंकी नंबर टाकायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल्स टाकायचे आहे. सर्व माहिती नीट भरून तुम्ही अर्ज हा जमा करायचा आहे अर्जासोबत खालील कागदपत्रे तुम्हाला जोडावी लागणार आहेत.
कागदपत्रे कोणती जोडायची ?
वरील फॉर्म … Read More