ST Student Free Hostel Yojana :- नमस्कार मित्रांनो, या लेखांमध्ये आपण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या फ्री होस्टेल योजनेबाबत माहिती घेणार आहोत. तर या हॉस्टेलमध्ये मोफत राहणं, जेवण मोफत, पुस्तके मोफत, सहल भत्ता मोफत दिल्या जातो या सर्व सुविधांचा लाभ कसा घ्यायचा याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
ST Student Free Hostel Yojana | आदिवासी विकास विभाग हॉस्टेल योजना | पंडित दीनदयाल हॉस्टेल योजना | आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत हॉस्टेल योजना त्याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना माहिती
महाराष्ट्र सरकार हे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवत असते. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने आदिवासी विभाग अंतर्गत मुला व मुलींना मोफत वस्तीगृह सो ही उपलब्ध करून दिलेली आहे. या वस्तीगृहामध्ये मोफत राहणे, मोफत जेवण, नाश्ता, मोफत वह्या पुस्तके ही आदिवासी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येतात.
योजनेचे नाव | पंडित दीनदयाल उपाध्याय हॉस्टेल योजना |
राज्य | महाराष्ट्र |
कुणासाठी | आदिवासी विद्यार्थी |
लाभ | मोफत हॉस्टेल, व या पुस्तके व बरेच काही |
ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आदिवासी विभाग मार्फत हॉस्टेल ही सुरू करण्यात आलेली आहेत.
प्रवेश कुणाला मिळणार
जे विद्यार्थी आठवी मध्ये किंवा आठवीच्या पुढील वर्गामध्ये कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश हा वस्तीगृहामध्ये देण्यात येतो. हा प्रवेश मेरिटनुसार लावण्यात येतो
कागदपत्रे कोणती लागणार
वसतिगृहामध्ये प्रवेश अर्ज भरण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता ही भासणार आहे.
- आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक
- आधार कार्ड
- दहावी गुणपत्रक
- बारावी गुणपत्रक
- मागील कोणती परीक्षा पास झाला त्याचे गुणपत्रक
- तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शाळेची बोनाफाईड
- जातीचा दाखला
- डोमासाईल
वरील कागदपत्रे ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागत असतात.
ऑनलाईन अर्ज कुठे व कसा करायचा ?
ऑनलाइन अर्ज तुम्ही वरील लिंक वरती क्लिक करून स्वतः तुमच्याकडे पीसी किंवा लॅपटॉप असेल तर करू शकता. तुम्ही अर्ज करत असताना माहिती बरोबर भरलेली आहे की नाही याची खात्री करा.
जर तुम्हाला तुमचा ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर जवळच्या सीएसटी केंद्रावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज हा भरून घ्यायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुम्ही कोणत्या होस्टेलला प्रवेश घेणार आहात त्या हॉस्टेलमध्ये जमा करायचा आहे.
त्यानंतर काही दिवसानंतर याद्या हा प्रसिद्ध करण्यात येतात या या त्यामध्ये तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्ही हॉस्टेलमध्ये प्रवेश हा घेऊ शकता.
तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. मित्रांनो जर ही माहिती आवडली असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना सुद्धा या होस्टेल बद्दल माहितीही होणार आहे.
1 thought on “पंडित दीनदयाल उपाध्यक्ष स्वयंम योजना हॉस्टेल फॉर्म अर्ज सुरू | ST Student Free Hostel Yojana”