E Pik Pahani Kashi Karaychi : ई पीक पाहणी अशी करा तुमच्या मोबाइल वरुण ..

E Pik Pahani Kashi Karaychi : नमस्कार मित्रांनो, या लेखांमध्ये आपण खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये ई पिक पाहणी कशी करायची ? सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत. पिकाची माहिती कशी नोंदवायची ? बांधावरची झाडे कशी नोंदवायची? याची सविस्तर माहिती आपण येथे खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

E Pik Pahani Kashi Karaychi | ई पीक पाहणी कशी करायची ? | बांधावरची झाडे सातबारा वरती कशी नोंदवायची ? | शेतीचा पीक पेरा सातबारा कसा लावायचा. याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.

ई पीक पाहणी ओळख 2024

महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवत असते. शेतीची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना वितरित करणे सोपे जावे. त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये कोणत्या प्रमाणात कोणत्या पिकाचे जास्त उत्पादन घेतले जाते याची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाने इ पीक पाहणी हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे.

योजनेचे नाव ई पीक पाहणी 2024
एप्लीकेशन लिंक येथे क्लिक करा
हंगाम खरीप 2024
राज्य महाराष्ट्र

ई पीक पाहणी या ॲप मध्ये आपण म्हणजे शेतकरी स्वतः त्यांच्या पिकाची नोंदणी ही सातबारा वरती करू शकणार आहात. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क हे तलाठी किंवा इतर कुणालाही द्यावे लागत नाही. याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

ई पीक पाहणी केल्याचे फायदे काय आहेत ?

जर तुम्ही ई पीक पाहणी केले तर तुम्हाला खालील फायदे हे मिळत असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही पिक पाहणी करून घ्यायचे आहे.

  • नुकसान भरपाई वाटप करण्यास सरकारला सोपे जाते,
  • तुमच्या सातबारावर तुम्हीच पिकांची नोंदणी किंवा विहीर बोरवेल शेततळे यासारख्या बाबींची नोंदणी करू शकता. तलाठी यांच्या पाया पडायची गरज नाही.
  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेऊ शकता.
  • इतर शासकीय योजनांसाठी पीक पेरा करणे हा अत्यंत आवश्यक आहे.

तर मित्रांनो, वरील फायदे हे पीक पाहणी केल्याचे आहेत. अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.

E Pik Pahani Kashi Karaychi ?

पिक पाहणी करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स पूर्ण करायचे आहेत.

  • सर्वात आधी तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून पिक पाहणी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्ही नवीन शेतकरी नोंदणी करायची आहे.
  • नवीन शेतकरी नोंदणी करत असताना तुमच्या मोबाईल वरती चार अंकी सांकेतांक पाठवण्यात येईल तो सांकेतांक टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी पिकाची नोंदणी करायची आहे.
  • त्यानंतर बांधावरची झाडे नोंदणी करायची आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती ही अपलोड करायची आहे.

तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही पिक पाहणे हे करायचे आहे. जर ईपीक पाहणी करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही तलाठी यांची मदत घेऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला पीक पाणी कसे करावे याचे जर संपूर्ण मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा नक्कीच तुम्हाला त्याची मदती करण्यात येईल.

Leave a comment