Pik Vima Online Arj Maharashtra : पीक विमा ऑनलाइन अर्ज कसा करायचा ..

Pik Vima Online Arj Maharashtra : नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकरी यांच्या पिकांना विमा देण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज हे सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी यांनी आपल्या पिकाचा विमा काढून घ्यायचा आहे.

Pik Vima Online Arj Maharashtra | प्रधानमंत्री पिक विमा योजना ऑनलाइन अर्ज कसा करायचा | एक रुपया पिक विमा योजना महाराष्ट्र | प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Pik Vima Online Arj Maharashtra
Pik Vima Online Arj Maharashtra

PMFBY ओळख

भारत सरकार हे आपल्या देशातील शेतकरी बांधव यांच्यासाठी विविध योजना राबवत असते. त्यामध्ये शेतकरी यांच्या पिकांचे नुकसान होत असते त्यामुळे भारत सरकारने त्यांच्या पिकांना संरक्षण म्हणून पिक विमा सुरू केलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हा पिक विमा फक्त एक रुपयांमध्ये देण्यात येत आहे. यासाठी तुम्हाला किती रुपये पर्यंत विमा देण्यात येतो याची सविस्तर माहिती आपण खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

योजनेचे नाव प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
भरावीची रक्कम फक्त एक रुपया
कोणत्या पिकासाठी भात, सोयाबीन, कापूस, ऊस ,मक्का, नाचणी इत्यादी पिकांसाठी
राज्य महाराष्ट्र

किती रुपये पिक विमा मिळणार

तुमच्या पिकासाठी किती रुपये पिक विमा मिळणार याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

मित्रांनो जर तुम्ही भात या पिकाची जर शेती करत असाल तर तुम्ही इथं बघू शकता खाली भात या पिकासाठी 49500 रुपये पर्यंत विमा दिला जाणार आहे. मित्रांनो इथं फार्मर शहर जे आहे ते 990 रुपये प्रति हेक्टरला दाखवण्यात आलेले आहे. मात्र जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही अर्ज कराल तेव्हा महाराष्ट्र सरकार तुम्हाला काही सूट देत असते त्यावेळी तुम्हाला फक्त एक रुपया हा पे करावा लागणार आहे.

त्याचप्रमाणे जर तुम्ही कापूस या पिकाची शेती करत असाल तर तुम्हाला प्रति हेक्टर 49 हजार पाचशे रुपये पर्यंत विमा देण्यात येणार आहे

त्याच प्रमाणे जर तुम्ही इतर कोणत्या पिकाची शेती करत असाल तर त्याचा तुम्हाला विमा कॅल्क्युलेट करायचा असेल, तर तुम्ही प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या ऑफिसियल वेबसाईट वरती भेट द्यायचे आहे व तुम्हाला किती रुपये विमा मिळणार याची चौकशी ही या वेबसाईट वरती पाहू शकणार आहात.

पिक विमा भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्र व माहिती ही लागणार आहे.

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सातबारा व आठ हजार
  • मोबाईल नंबर
  • स्वयंघोषणापत्र

वरील माहिती ही तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?

मित्रांनो ऑनलाईन अर्ज हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता. त्यासाठी तुम्ही माहिती ही व्यवस्थित भरायचे आहे.

जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तिथे ऑनलाईन अर्ज हा करून घ्यायचा आहे. पोच पावती याची प्रिंट तुम्ही त्यांच्याकडून मागायला विसरू नका.

पिक विमा केव्हा मिळतो ?

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर जर तुमच्या पिकांचे नुकसान झाले तर तुम्हाला पिक विमा हा नक्कीच मिळत असतो.

अनेकदा पिक विमा हा एक ते दीड वर्षानंतर देण्यात येतो त्यामुळे तुम्हाला तेवढा धीर हा धरावा लागणार आहे. त्यामुळे सध्या एक रुपयांमध्ये सर्वच शेतकरी बांधवांनी या योजनेचा नक्की लाभ घेऊन पिक विम्याचा अर्ज हा भरायचा आहे. अर्ज करताना काही अडचणीत असतील तर खाली आपल्याला कमेंट करून सांगा तुम्हाला अर्ज भरून देण्यात येईल.

तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला सुद्धा जॉईन व्हा येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या अपडेट्स हा वेळेवरती आणि मोफत देण्यात येतात त्यामुळे नक्कीच जॉईन व्हा आणि योजनांपासून वंचित राहू नका.

1 thought on “Pik Vima Online Arj Maharashtra : पीक विमा ऑनलाइन अर्ज कसा करायचा ..”

Leave a comment